Maharashtra Rain Update : राज्यात १० लाख एकर शेती पाण्याखाली, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती; अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Rain Update: राज्यात सुमारे दहा लाख एकर शेती पाण्याखाली गेली असून पुढील दोन दिवसांत पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे,
Maharashtra Rain Update : राज्यात  १० लाख एकर शेती पाण्याखाली, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती; अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती
Updated on

Summary

  1. राज्यात १० लाख एकर शेती पाण्याखाली, अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण.

  2. मुंबईसह नांदेड, कोकण, पुणे व बीड जिल्ह्यांत धोक्याची परिस्थिती; NDRF व सैन्य मदतीसाठी दाखल.

  3. कॅबिनेट बैठकीत पावसाचा आढावा घेऊन पुढील निर्णय होणार – अजित पवार.

मागील दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सुमारे दहा लाख एकर शेती पाण्याखाली गेली असून पुढील दोन दिवसांत पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन अलर्टवर आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com