Ahilyabai Holkar : ...तेव्हा मल्हाररावांनी रोखलं नसतं तर आज इतिहास घडला नसता!

आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे.
Ahilyabai Holkar
Ahilyabai HolkarSakal

भारतीय इतिहासात अशा काही स्त्रिया आहेत ज्या केवळ त्यांच्या धैर्यासाठीच नव्हे तर महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणांच्या दिशेने टाकलेल्या क्रांतिकारक पावलांसाठी ओळखल्या जातात. यामध्ये अहिल्याबाई होळकर यांचं नाव आघाडीवर आहे. अहिल्याबाईंनी आपल्या पतीच्या निधनानंतर अवघ्या २९ व्या वर्षी सती जाण्याचा निर्णय घेतला होता.पण सासरच्यांनी त्यांना रोखलं आणि पुढे त्यांनी त्यांच्या कामातून इतिहास घडवला.

१७२५ मध्ये ३१ मे रोजी महाराष्ट्रातल्या औरंगाबाद शहरात चौडी नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. समाजात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण नगण्य असताना वडील माणकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर एका दौऱ्यादरम्यान चौडी गावी मुक्कामी होते, तेव्हा त्यांनी अहिल्याबाईंना भुकेल्या आणि गरीब लोकांना भक्तिभावाने जेवण देताना पाहिलं. एवढ्या लहान वयात अशी सेवा पाहून त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी आपल्या मुलासाठी अहिल्याबाईंना मागणी घातली. त्यानंतर अवघ्या ८ व्या वर्षी अहिल्याबाई होळकर घराण्याच्या सूनबाई झाल्या.

Ahilyabai Holkar
Ahilyabai Holkar Jayanti: पुरोहीतगीरीच्या विरोधात निर्णय घेतले अन् अहिल्यादेवी मराठी साम्राज्याची पहिली सम्राज्ञी बनली

सती जाणार होत्या पण...

१७५४ मध्ये कुंभेरच्या लढाईत वयाच्या २९ व्या वर्षी त्यांचे पती खंडेराव मरण पावले. त्यानंतर त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंना रोखलं आणि त्यांना साथ दिली.

शिवभक्त समजल्या जाणाऱ्या अहिल्याबाईंनी मुस्लीम शासकांनी उद्धवस्त केलेली काशीपासून ते गया, अयोध्या, सोमनाथ, जगन्नाथपुरी अशी अनेक मंदिरं पुन्हा बांधली.शिवाची पूजा केल्याशिवाय अहिल्याबाई पाणीही प्यायच्या नाहीत, असंही सांगितलं जातं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र दुःखाने भरलेलं होतं. कमी वयात पतीचं निधन, त्यानंतर मुलाचा मृत्यू, मुलीचं निधन या सगळ्यामुळे त्या दुःखी होत्या. इंदूरसाठी त्यांनी केलेल्या कामांचे परिणाम आजही दिसत आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com