

Police rescue four sisters from Ahilyanagar village after shocking sexual assault case; accused relative arrested.
एका नातेवाईकाने चार सख्ख्या बहिणींवर, ज्यात तीन अल्पवयीन आणि एक विवाहित, लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले.
विवाहित बहिणीने पतीला सांगितल्यावर संस्थेच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल झाली.
पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले असून, सखोल तपास सुरू आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटंबातील चार सख्ख्या बहिणींवर नातेवाईकानेच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. नराधमाने तीन अल्पवयीन मुलीसह त्यांच्या लग्न झालेल्या बहिणीलाही सोडले नाही. राहुरी तालुक्यातील एका गावात घडलेला हा प्रकार समोर आल्यावर संतापाची लाट आहे. आरोपीला कडक शिक्षा केली जावी अशी मागणी लोक करत आहेत.