Laxman Hake Car Attack in Ahilyanagar
esakal
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके अहिल्यानगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, त्यापू्र्वी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून लक्ष्मण हाके यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. यावेळी अज्ञात हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ते घटनास्थळाहून पसार झाले.