Balasaheb Thorat: शेतकऱ्यांच्या जिवनात पशूधनाचं महत्व मोठं, बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन

शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाने अनेक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक विकासाला मोठी बळकटी दिली आहे.
Balasaheb Thorat: शेतकऱ्यांच्या जिवनात पशूधनाचं महत्व मोठं, बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन

Balasaheb Thorat on Agriculture: शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाने अनेक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक विकासाला मोठी बळकटी दिली आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे सात लाख लिटर दुधाची निर्मिती होत असून शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन माजी कृषिमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

राजहंस दूध संघ येथे वसुबारसनिमित्त गाईंचे पूजन करण्यात आले. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, डॉ. तुषार दिघे, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले की, दूध संघाने तालुक्याची ग्रामीण आर्थिक व्यवस्था मजबूत केली आहे. राजहंस दूध संघ हा राज्यात प्रथम क्रमांकाचा ओळखला जात असून, दीपावलीनिमित्त दूध संघाने ३२ कोटी रुपये बँकेत वर्ग करून दूध उत्पादक, कामगार, व्यापारी यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. संगमनेरच्या सहकारी संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे.

वसुबारसनिमित्त तालुक्यात गायींचे पूजन केले जात आहे. तालुक्यात पशुधन मोठे असून, दररोज सुमारे सात लाख लिटर दूध निर्माण होत आहे. मोठ्या कष्टातून उभ्या असलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शेतकरी बंधू व महिलांसह दूध संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Latest Marathi News)

राजहंस संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख म्हणाले, "भारतीय संस्कृतीत गाईला आईचे स्थान दिले आहे. तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दूध संघाच्या वतीने गायींच्या आरोग्यासाठी जंत निर्मूलन, विविध लसीकरण सातत्याने केले जात असून, पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे." (Latest Marathi News)

Balasaheb Thorat: शेतकऱ्यांच्या जिवनात पशूधनाचं महत्व मोठं, बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन
Tanaji Sawant Video: "मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, कुणी राडा केला तर..."; तानाजी सावंतांच्या वक्तव्याने खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com