Shivaji Kardile : सर्वसामान्यांचा नेता हरपला ! भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे हृदयविकाराने निधन; ६६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

Shivaji Kardile : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेनंतर पुन्हा विजय मिळवला, तर 2019 मध्ये पराभूत झाले आणि 2024 मध्ये पुन्हा विजयी झाले. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी दूध व्यवसाय, बांधकाम साहित्य पुरवठा आणि हॉटेल उद्योग या क्षेत्रात काम केले.
BJP MLA and senior leader Shivaji Kardile, who represented Rahuri constituency in Ahmednagar, passed away at 66

BJP MLA and senior leader Shivaji Kardile, who represented Rahuri constituency in Ahmednagar, passed away at 66

esakal

Updated on

Summary

1️⃣ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले (वय 66) यांचे निधन झाले.
2️⃣ त्यांना तब्येत बिघडल्याने अहिल्यानगर येथील साईदीप साह्यद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
3️⃣ कर्डिले यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा भाजपकडून निवडणूक लढवून विजय मिळवला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले (वय ६७) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे, तर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अक्षय कर्डिले यांचे वडील होत.

कर्डिले यांना आज पहाटे हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने अहिल्यानगर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच बुऱ्हाणनगर येथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. सायंकाळी त्यांच्या गावी बुऱ्हाणनगर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com