Air India alcohol Rules : एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये किती दारू दिली जाते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India alcohol Rules

Air India alcohol Rules : एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये किती दारू दिली जाते?

Air India alcohol Rules : 26 डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा यांनी मद्यप्राशन करून एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर 6 जानेवारी रोजी देखील पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या आणखी एका आंतरराष्ट्रीय विमानात असेच प्रकरण समोर आले होते. त्यात एका मद्यधुंद प्रवाशाने जवळच बसलेल्या एका महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली होती.

हेही वाचा: Hyper Parenting : पालकांच्या अति काळजीमुळे बिघडतेय तरुण पिढी? या चुका टाळा

त्याने त्याच्या कृत्याबद्दल लेखी माफी मागितली होती आणि हे प्रकरण तिथेच मिटले होते. मात्र आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर लघवी करणाऱ्या प्रवाशांच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, फ्लाइटमध्ये अशी किती दारू सर्व्ह केली जाते ज्यामुळे प्रवाशांचे शरीरावरील नियंत्रण का सुटते?

हेही वाचा: Hyper Parenting : पालकांच्या अति काळजीमुळे बिघडतेय तरुण पिढी? या चुका टाळा

एअर इंडियाने आपल्या वेबसाइटवर प्रवाशांना पुरवलेल्या अन्न आणि अल्पोपहाराच्या गाईडलाईन्स मध्ये असं सांगितलं आहे की आंतरराष्ट्रीय मार्गांवर चालणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मोफत मद्य किंवा वाईन दिली जाईल. त्याच वेळी, दुसर्‍या ठिकाणी असे लिहिले आहे की नाश्ता वगळता इतर सर्व प्रमुख जेवण सेवांमध्ये प्रवाशांना दारू दिली जाईल.

हेही वाचा: Parenting Tips : आईवडिलांमधील भांडण 'नॉर्मल' समजणं बंद करा, मुलांवर होतात हे परिणाम

याशिवाय, एअर इंडियाच्या वेबसाइटवर प्रवाशांना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे लिहिले आहे की CISF प्रमाणे, आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री शॉप्समधून खरेदी केलेल्या 100 मिली पेक्षा जास्त मद्य हँडबॅगमध्ये ठेवण्याची परवानगी नाही.

हेही वाचा: Angarki Sankashti chaturthi : संकष्टीच्या उपवासाला चालणारा बटाटा भारतात कधी आला

ही आहेत एअर इंडियाची मार्गदर्शक तत्त्वे

एअर इंडियाच्या वेबसाइटवरील एअर इंडिया अल्कोहोल सर्व्हिंग मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एअरलाइन म्हणते की प्रवाशांनी 4 तास किंवा त्याहून कमी विमान प्रवासादरम्यान दोनदा दोन पेगपेक्षा जास्त अल्कोहोल पिऊ नये. त्याच वेळी, लांब पल्ल्याच्या आणि कालावधीच्या प्रवासादरम्यान, दर तासाला फक्त एक पेय दिले जाईल. मात्र, सतत अल्कोहोल सर्व्ह करताना फ्लाइट क्रूने त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Angarki Chaturthi : अंगारकी चतुर्थी निमित्त फराळासाठी बनवा खास उपवसाची इडली

यामुळे देखील लोक अति मद्यधुंद होतात

विमान प्रवासादरम्यान सहसा वाईन, वोडका, व्हिस्की, रम, जिन आणि इतर प्रकारचे अल्कोहोल दिले जाते. तथापि, आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये नियमित प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, काही लोक अगोदर मद्यप्राशन करून फ्लाइटमध्ये प्रवास करतात आणि नंतर फ्लाइटच्या आतही दारू पितात. याशिवाय दारूची कोणतीही निश्चित मर्यादा नसल्यामुळे आणि चालक दलातील सदस्यांना विवेकबुद्धी वापरण्याचे स्वातंत्र्य नसल्यामुळे प्रवाशांच्या आग्रहापुढे दारू द्यावी लागते. आणि मद्यपान करून शरीरावरील कंट्रोल सुटण्याच्या घटना घडतात.

टॅग्स :drinkAlcoholAir IndiaWine