
गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी जगाला हादरवणारी विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाचे विमान मेघाणीनगरमध्ये कोसळले. यात 265 जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पुन्हा एकदा आकाशात भीती पसरली. सकाळी मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AIC129 विमान अर्ध्यातूनच मुंबईला परतले. हे विमान वेळेवर लंडनला निघाले होते. पण काही वेळाने ते परत मुंबईला वळवावे लागले. या विमानाने तीन तास आकाशात घिरट्या घातल्या अन् मग इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले.