
ST कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सदावर्तेंचा सहकारी अजय गुजरला अटक
औरंगाबाद : एसटी संघटनेचा अध्यक्ष असलेल्या कर्मचारी अजय गुजर याला पोलिसांनी आज शुक्रवारी (ता.१५) औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. गुजर हा अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांचा सहकारी आहे. ही कारवाई अकोल्यातील अकोट पोलिसांनी केली आहे. अजय गुजर हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. एसटी कामगार (ST Worker) संघटनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोट पोलीस ठाण्याला अॅड. गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील, अजय गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांकडून ७४ हजार ४०० रुपये निधी संकलित करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा: बाप-लेकाने रात्रभर पिकाला पाणी दिले, वडील घरी गेले अन् मुलाने घेतला गळफास
दरम्यान आज शुक्रवारी या प्रकरणी आरोपी अजय गुजर याला औरंगाबाद (Aurangabad) येथून अकोट पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली आहे.
Web Title: Ajay Gujara Arrested In Aurangabad For St Workers Cheating
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..