बाप-लेकाने रात्रभर पिकाला पाणी दिले, वडील घरी गेले अन् मुलाने घेतला गळफास | Aurangabad Latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

बाप-लेकाने रात्रभर पिकाला पाणी दिले, वडील घरी गेले अन् मुलाने घेतला गळफास

पाचोड ( जि.औरंगाबाद ) : उन्हाळी बाजरीला शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका बावीस वर्षीय युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना औरंगाबादमधील (Aurangabad) कुतुबखेडा (ता.पैठण) येथे शुक्रवारी (ता.१५) सकाळी उघडकीस आली. अभिषेक संतराम भुकेले असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. यासंबंधी अधिक माहीती अशी, कुतुबखेडा येथील शेतकरी अभिषेक संतराम भुकेले हा रात्रीचा विद्युत पुरवठा असल्याने तो व त्याचे वडील हे दोघे जण शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले. रात्रभर अभिषेक व त्याच्या वडीलाने शेतातील उन्हाळी बाजरीसह अन्य पिकाला पाणी दिले. (Son Hanged Himself To Tree In Paithan Taluka Of Aurangabad)

हेही वाचा: Aurangabad News| औरंगाबादेतील चिकलठाणा कचरा डेपोला भीषण आग

सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अभिषेकचे वडील आंघोळ करण्यासाठी घरी आले. मात्र थोडावेळ वीज असल्याने अभिषेक तिथेच पाणी देण्यासाठी थांबला. बराच उशीर झाला तरी अभिषेक घरी न आल्याने त्याचे आजोबा शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना अभिषकने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तोच त्यांनी तात्काळ या घटनेची माहीती कुंटुंबियासह गावकरी व पोलिस पाटलांना दिली. माहीती मिळताच ग्रामस्थांसह कुटुंबियांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पाचोड (Pachod) पोलिसांना घटनेची माहिती दिली.

हेही वाचा: ''दानवेंनी आरोप करण्यापेक्षा आम्हाला सरकार्य करावे''

तोच बीट जमादार किशोर शिंदे, फेरोझ बर्डे यांनी कुतुबखेडा येथे धाव घेऊन अभिषेक यास झाडावरून खाली उतरुन उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांने अभिषेक यास तपासून मृत घोषित केले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर शिंदे, फेरोझ बर्डे आदी पोलिस कर्मचारी करीत आहेत.

Web Title: Son Hanged Himself To Tree In Paithan Taluka Of Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top