

Ajay Maharaj Barskar ED complaint
ESakal
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता एक नवे आणि खळबळजनक वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जरांगे यांचे माजी सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांचे निकटवर्तीय पांडुरंग वसंतराव तारक यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय (ED) आणि आयकर विभागाकडे थेट लेखी तक्रार दाखल केली आहे.