Sharad Pawar: शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत ‘या’ दोन नेत्यांना माहिती होतं, बड्या नेत्याची माहिती

राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना कल्पना होती, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांने सांगितलं
Sharad Pawar Withdraw Resignation timeline Know  political events that happened in the last four days
Sharad Pawar Withdraw Resignation timeline Know political events that happened in the last four days esakal

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदवरून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. कारण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनाही शरद पवार यांच्या या निर्णयाबद्दल कल्पना नव्हती. मात्र शरद पवार यांच्या या राजीनाम्याबाबतच्या निर्णयाची कल्पना राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना होती, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घडामोडीवर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. ” शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घडामोडीमध्ये मी नव्हतो. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना या राजीनाम्याची कल्पना असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अर्धवट सोडून मी कोर्टात गेलो. तिथे मला कळालं की पवारसाहेबांनी राजीनामा दिला आहे आणि मला धक्काच बसला, असंही ते यावेळी म्हणाले. तर पवारसाहेबांनी कमिटी गठीत केली. पण मी आधीच सांगितलं की कमिटी मला मान्य नाही. कुटुंबातील नेत्यांना या निर्णयाची माहिती होती, असंही छगन भुजबळ म्हणालेत.

Sharad Pawar Withdraw Resignation timeline Know  political events that happened in the last four days
Accident News: दुर्दैवी! राज ठाकरेंच्या सभेसाठी जाताना भीषण अपघात; मनसैनिकाचा मृत्यू तर 2 जण जखमी

शरद पवार यांनी २ मे रोजी निवृत्तीची घोषणा केली होती. तिथल्या तिथेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. कोणी रडत होत, कोणी आरडाओरड करत होतं तर कोणी घोषणा देत होतं. त्यामुळे या निर्णयावर विचार करण्यासाठी पवारांनी तीन दिवसांचा वेळ मागितला होता.

तीन-चार दिवसांपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईतच ठाण मांडून होते. अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केल्याची माहिती आहे. शिवाय देशभरातून अनेक पदाधिकाऱ्यांनी फेरविचार करुन सध्या तरी तुम्हीच पदावर राहावं, अशा विनवण्या केल्या.

Sharad Pawar Withdraw Resignation timeline Know  political events that happened in the last four days
मोहात पडला नाही; सापडलेले लाखो रुपये केले परत, सांगोल्याच्या तरुणाचं होतंय कौतुक

काल शरद पवारांनी वाय. बी. सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचे संकेत पवारांनी दिले आहेत. मात्र दरम्यानच्या काळात अध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील यांची नावं चर्चेत होती.

Sharad Pawar Withdraw Resignation timeline Know  political events that happened in the last four days
Accident News: सांगलीतील विजापूर-गुहागर मार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com