
गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही राज्यांमधील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑगस्ट २०२५ चा पगार, वेतन आणि पेन्शन वेळेपूर्वी जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोणत्याही आर्थिक चिंताशिवाय सणाचा आनंद घेता यावा यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कधी खात्यात येणार याची तारीख सांगितली आहे.