Ajit Pawar Astrology : अजित पवार होणार मुख्यमंत्रीपदाचे दावेदार? ज्योतिषी म्हणतात, कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar Astrology

Ajit Pawar Astrology : अजित पवार होणार मुख्यमंत्रीपदाचे दावेदार? ज्योतिषी म्हणतात, कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार...

Ajit Pawar Astrology : नवीन वर्ष कसं जाणार, याची प्रत्येकाला उत्सूकता असते. नवीन वर्ष कुणासाठी चांगले असते तर कुणासाठी वाईट. हे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार कळते. महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) यांनी नवीन वर्षानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती सांगितली आहे. (Ajit Pawar Astrology how will be new year for ncp )

हेही वाचा: Devendra Fadnavis Astrology : फडणवीसांची केंद्रात वर्णी लागणार? ज्योतिषी म्हणतात, नवीन वर्षी मोठी जबाबदारी येणार...

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले, "कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार अजित पवार यांना 2023 हे वर्ष शुभ फलदायी ठरणार आहे. मध्यवर्ती निवडणूका लागल्यास मुख्यमंत्रीपदाचे ते दावेदार राहू शकतील. अजित दादांना फेब्रु- मार्च पासून शुभ फल प्राप्त होतील."

हेही वाचा: Devendra Fadnavis Astrology : फडणवीसांची केंद्रात वर्णी लागणार? ज्योतिषी म्हणतात, नवीन वर्षी मोठी जबाबदारी येणार...

अजित पवारांची खर तर कुंडलीतील ग्रहस्थिती उत्तम आहे. त्यामुळे कितीही सरकार बदलले तरी त्यांचं पद कायम असतं. मग देवेंद्र फडणवीसांच्या काळातील उपमुख्यमंत्रीपद असो की उद्धव ठाकरे यांच्या सत्तेतील उपमुख्यमंत्रीपद असो.

आजही सत्ता नसताना ते विरोधी पक्षनेतेच्या मोठ्या पदावर आहे. त्यामुळे जर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचाली झाल्या तर अजित पवार कोणत्या पदावर असणार, हे पाहण्यासारखे राहणार.