Ajit Pawar : ''फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार कृतीतून दिसला पाहिजे, भाषणातून नाही'' अजित पवारांचा बारामतीतून निशाणा

ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

बारामतीः बारामतीमध्ये आज अजित पवार यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होते. सुरुवातीला अजित पवारांची जंगी मिरवणूक काढण्यात आलेली होती. बारामतीकरांनी दुतर्फा गर्दी करीत अजित पवारांचं जोरदार स्वागत केलं.

नागरी सत्कारानंतर थेट अजित पवार बोलायला उभे राहिले. ते म्हणाले की, मला प्रश्न पडलाय की, मी बारामतीकरांपुढे काय बोलायचं? १९९१ पासून तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली. आज जो काही अजित पवार आहे तो बारामतीकरांमुळे आहे.

ajit pawar
Sanjay Raut on Sharad Pawar: अजित पवारांविरोधात शरद पवारांचा 'गनिमी कावा'; संजय राऊतांचा मोठा दावा

''घरातल्या लोकांसमोर औपचारिक काय बोलावं? असा प्रश्न माझ्यासमोर आह. पाचव्यांदा मला उपमुख्यमंत्री पदाची संधी एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे.''

पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून काम करणारे ज्येष्ठ नेते आज सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्यातल्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. महापुरुषांच्या विचारांनी आपल्याला पुढे जायचं आहे.

ajit pawar
CBI : सीबीआयने धाड मारल्यानंतर कस्टम अधिकाऱ्याची आत्महत्या; तलावामध्ये उडी मारुन दिला जीव

''मी कामाचा भोक्ता आहे, कामातच रममान होणारा मी कार्यकर्ता आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर महाराष्ट्रात विकास कसा करता येईल, हेच मी बघत आलेलो आहे. मागच्या ३०-३२ वर्षांपासून तुम्ही हे बघत आलेला आहात.''

शेवटच्या घटकालाही वाटलं पाहिजे की, हा लोकप्रतिनिधी ठाराविक लोकांकडे न बघता आपलंही काम करतोय. आपली बारामती बदलत आहे. तुम्ही मनापासून आशीर्वाद देता, हे माझं भाग्य आहे, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे बोलले की, इथून पुढच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी सभा घ्याव्या लागतली. कारण मी घेतलेली भूमिका महाराष्ट्राला समजून सांगावी लागले. नेमकी कशामुळे मी ही भूमिका घेतली? हे सांगावं लागणार आहे.

ते पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळात मागासवर्गीयांचा, मुस्लिमांचा, ओबीसींचा आणि महिलेचा समावेश केला आहे. सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललो आहे. हे कृतीतून दिसलं पाहिजे केवळ भाषणातून नाही. त्यामुळे मी भूमिका समजून सांगण्यासाठी राज्यभर फिरणार आहे. राज्यातील एकाही घटकाही असुरक्षित वाटलं नाही पाहिजे. जोपर्यंत आम्ही मंत्रिमंडळामध्ये आहोत, तोपर्यंत कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही, असं अजित पवार बोलताना म्हणाले.

अजित पवारांच्या आजच्या बोलण्याचा रोख शरद पवारांच्या कालच्या सभेवर होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कालच्या पवारांच्या कोल्हापूरच्या सभेत पुरोगामी विचारांचा जागर करण्यात आला. त्यामुळे हे विचार कृतीतून दिसले पाहिजेत, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sharad Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com