राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवारांचे बंड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

राज्यातील राष्ट्रपती राजवट हटविल्यानंतर या नव्या सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. आता अजित पवारांसोबत कोणते राष्ट्रवादीचे आमदार आहेत, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भाजपने काही अपक्षांना जवळ केले असले तरी त्यांना 15 ते 20 आमदार आणखी हवे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असे सध्यातरी दिसत आहे.

मुंबई : अजित पवार यांनी आज (शनिवार) भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच अजित पवारांनी बंड केल्याचेही यावरून दिसत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र आल्याचे यावरून तरी दिसत आहे. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. अजित पवार यांच्यासोबत बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हेही उपस्थित होते. शरद पवार यांचा या निर्णयाला पाठिंबा आहे का, असे प्रश्न उपस्थित होत असताना पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

भाजपला 105 जागा मिळाल्या असताना शिवसेनेने साथ न दिल्याने त्यांना सत्ता स्थापन करता आली नव्हती. त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे नवे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित होत असताना अचानक आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती झाली का, याबाबत चर्चांना सुरवात झाली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठिशी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप अजित पवारांना घेऊन कसे बहुमत सिद्ध करणार हा प्रश्न आहे.

अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस

राज्यातील राष्ट्रपती राजवट हटविल्यानंतर या नव्या सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. आता अजित पवारांसोबत कोणते राष्ट्रवादीचे आमदार आहेत, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भाजपने काही अपक्षांना जवळ केले असले तरी त्यांना 15 ते 20 आमदार आणखी हवे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असे सध्यातरी दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar became rebel of nationalist congress party