Maharashtra Politics: रोहित पवारांची वेगळी चूल? त्या कार्यक्रमावरून अजित पवार म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics: रोहित पवारांची वेगळी चूल? त्या कार्यक्रमावरून अजित पवार म्हणतात...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी साडेपाच वाजता शासकीय कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री जयंती उत्सवाला सुरुवात केली. रोहित पवार यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अशातच विरोधी पक्ष नेते आणि काका अजित पवार यांनी यांसदर्भात माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे रोहित पवार यांनी वेगळी चूल मांडली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (ajit pawar big statement on Ahilyabai Holkar Jayanti Rohit Pawar Midnight celebrate )

रोहित पवार यांनी काल मध्यरात्रीत पूजा करुन मिरवणूक काढली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्मभूमीतून उज्जैन येथून आणलेल्या हत्तीची चौंडीमध्ये पूजा करण्यात आली. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यासर्वाची माहिती रोहित पवार यांनी स्वतः फेसबुकवर शेअर केली आहे.

यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच अजित पवार यांना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रोहित पवारासंदर्भात विचारले असता 'मी रात्री उशीरापर्यंत राष्ट्रवादी भवनात होतो. अनेकजण माझ्या भेटीला येत होते. त्यानंतर मी थेट सीबी ऑफिसमध्ये आलो आहे. त्यामुळे मला चौडीत रोहित पवार यांनी कुठला कार्यक्रम घेतला माहिती नाही. असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय गोटात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज (बुधवारी) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आज होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, इंदूरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सकाळी पाच वाजता येथील महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला.