Ajit Pawar Birthday : मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की... मिटकरींचे ट्विट व्हायरल

Ajit Pawar Birthday
Ajit Pawar Birthdayesakal
Updated on

Ajit Pawar Birthday : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता बॉम्ब पडेल याचा नेम नाही. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपला गट घेऊन एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले. अवघ्या काही तासांपूर्वी विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार दुपारच्या शपथविधीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. मात्र तेव्हापासूनच अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे अंदाज अनेक राजकीय पंडित वर्तवत आहे.

Ajit Pawar Birthday
Irshalwadi Landslide : आदित्य ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे इर्शाळवाडीचा दौरा करणार; ठाण्यातील मेळावा रद्द

दरम्यान, आज (दि. 22 जुलै) महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्रांचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी एक व्हिडिओ ट्विट करून महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्यात वळणावर नेऊन ठेवले.

अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अजित पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओला त्यांनी 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असे कॅप्शन दिले. (Ajit Pawar Birthday)

Ajit Pawar Birthday
WFI Election : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची तारीख ठरली; बृजभूषण यांचा मुलगा रिंगणात?

मात्र अमोल मिटकरींच्या या कॅप्शनमुळे महाराष्ट्रातील राजकारणात अजून एक मोठा भूकंप होण्याची शक्यता बळावत आहे. (Amol Mitkari News)

अजित पवारांच्या वाढदिवसादिवशीच महाराष्ट्राचे राजकारण तापवणारे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. आता या ट्विटवर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Ajit Pawar Birthday
Ajit Pawar News : अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील; राजकीय वर्तुळातील बड्या नेत्याचं वक्तव्य

विशेष म्हणजे मुंख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याच्या परिसरात देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागले आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी देखील अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे भाकित केले असून त्यांनी शिंदे गटातील नेत्यांनी ही गोष्ट लवकरात लवकर स्विकारावी असे म्हणत चिमटा देखील काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Amol Mitkari Reaction Jayant Patil Fadnavis Meeting
Marathi News Esakal
www.esakal.com