MPSC च्या जाहिराती कधी निघणार? अजित पवारांनी दिलं उत्तर

Ajit Pawar
Ajit PawarSakal

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) १५ हजार ५११ पदांची भरतीला मान्यता मिळाली आहे. यामुळे आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विविध खात्यांतील रिक्‍त पदांची माहिती तत्काळ संकलित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit pawar) यांनी दिले होते. त्यानुसार गट अ, गट ब व गट क श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली आणि 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली. आता त्यासाठी जाहिरात कधी निघणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

Ajit Pawar
MPSC : 'स्टेट सर्विस मेन' परीक्षेची तारीख जाहीर; जाणून घ्या

कुठंही अडचण न येता पोलिसांनी भरतीचं नियोजन केलं पाहिजे. सैनिकांच्या भरतीत मुला-मुलींना संधी मिळायला पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. एमपीएससीमार्फत भरण्यात येणाऱ्या जागा प्रत्येक विभागाने एमपीएससीला कळवाव्या. त्यासाठी ३० सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर भरती प्रक्रिया सुलभ होईल. संबंधित विभागातून माहिती आल्यानंतर एमपीएससीच्या जाहीराती निघतील, असे अजित पवार म्हणाले.

राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला सादर झालेले नाहीत. त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. सर्व विभागांनी रिक्त पदांची माहिती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणावरून भाजपला टोला -

दरम्यान, ओबीसी आरक्षणाबाबत देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने आम्ही ओबीसींचा इम्पिरिकल डेटा देऊ शकत नाही, असे सांगितले. आता कोण काय भूमिका घेतंय? हे सर्वांना दिसतेय. महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत होती, असे म्हणत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला. आता त्यातील वस्तूस्थिती समोर आली आहे. केंद्र सरकारने स्वतःची जबाबदारी झटकलेली आहे, असं ऐकायला मिळतंय. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ते दिसतंय. पण प्रतिज्ञापत्र मी अजून वाचलेलं नाही, असेही पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com