Ajit Pawar : खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा; अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी ः खर्चाची माहिती मागविली
ajit pawar conduct a judicial inquiry into the kharghar death case maharashtra bhushan award
ajit pawar conduct a judicial inquiry into the kharghar death case maharashtra bhushan award sakal

पुणे : महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी खारघर येथे झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, या मागणीसाठी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र दिले आहे. शिवाय या समारंभासाठी खूप मोठा खर्च झाला आहे.

खर्चाचा नेमका आकडा समजण्यासाठी या समारंभाच्या खर्चाबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात मागविली असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२१) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) वर्षभरातील कामाच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी अजित पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पवार म्हणाले, ‘‘या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची राज्य सरकारने जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात झालेल्या मृत्यूच्या संख्येत मोठी तफावत येत असल्याचे, या दुर्घटनेबाबत बाहेर येत असलेल्या विविध क्लिप्स माध्यमातून स्पष्ट होत आहे.

हा सरकारी कार्यक्रम होता. त्यामुळे यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची काळजी घेण्याचे सरकारचे काम आणि जबाबदारी होती. प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही. आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व महाराष्ट्रभूषण पुरस्कार समारंभासाठी झालेल्या प्रत्येकी एकूण खर्चापेक्षा या कार्यक्रमाला झालेला खर्च कितीतरी जास्त आहे.

मग एवढा मोठा खर्च करूनही उपस्थित श्री सदस्यांसाठी मंडप का टाकला नव्हता. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय का केली नव्हती. हे श्री सदस्य किमान सात तासांहून अधिक काळ उपाशी-तापाशी असल्याचे पोस्टमार्टेम अहवालातून उघड झाले आहे. याच कार्यक्रमात एका बाजूला चांदीच्या ताटात शाही जेवण करणारी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला पिण्यासाठी पाणीही न दिलेली मंडळी दिसत आहे. हा विरोधाभास कशासाठी?.’’

‘विद्यापीठातील रॅप सॉंग प्रकरण गंभीर’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या रॅप सॉंगचे प्रकरण खूपच गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. ही कारवाई इतकी कठोर असावी, भविष्यात विद्यापीठात असे रॅप सॉंग करण्यास कुणीही धजावणार नाही. यासंदर्भात मी कुलगुरू कारभारी काळे यांच्याशी मोबाईलवरून चर्चा केली आहे. त्यांनी हा प्रकार सुट्टीच्या दिवशी झाल्याचे सांगितले असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

होर्डिंग्जबाबत ‘नगरविकास’ नियमावली करावी - पवार

पिंपरी चिंचवड परिसरातील होर्डिंग्जच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू होणे, हे वाईटच आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा, अशा दुर्घटनाच होणार नाहीत. याची खबरदारी घेणे गरजेचे असते.

ही खबरदारी घेण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यभरासाठी एकच नियमावली तयार केली पाहिजे. ही नियमावली करताना, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक सर्व उपाययोजना, वारा, पाऊस तर येणारच. परंतु कितीही वारा आला तरी होर्डिंग्ज कोसळणार नाही, अशा पद्धतीने उभारणी करण्याचे बंधन या नियमावलीत असले पाहिजे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com