Ajit Pawar I कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गृहखात्याची, उपमुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याचे टोचले कान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेसाठी येऊ नका म्हणून सांगितलं जातं हे चुकीचं - उपमुख्यमंत्री पवार

अजित पवार म्हणाले, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गृहखात्याची

अमरावतीच्या एक खासदार आणि आमदार या दोघांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. मातोश्रीवर प्रार्थना म्हणायचा आणि हनुमान चालिसा म्हणायचा निर्णय घेतला. कुणी, कुठ काय म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्यातून कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याची जबाबदारी गृहखात्याची असते. काल पोलिसांनी सांगूनही राणा दाम्पत्याकडून काही गोष्टी घडल्या त्यामुळे शिवसैनिक संतापले आणि जे व्हायला नको ते झाले. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा पती-पत्नीला चिमटा काढला आहे. संविधानाने सर्वांना कायद्यानुसार मुभा दिल्या आहेत. मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेसाठी येऊ नका म्हणून सांगितलं जातं हे चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: चोरांवर दोन दगड पडले तर तळमळ कशाला? राऊतांचा भाजपला सवाल

राणा दाम्पत्याने पोलिसांवर केलेल्या आरोपासंदर्भात पवार म्हणाले, तुम्ही एखाद्या पक्षाच्या नेतृत्वाच्या घरासमोर प्रार्थना करण्याचा निर्णय घेता किंवा आंदोलन करता हे योग्य नाही. कधी कधी आम्हालाही तुम्ही काही ठिकाणी जाऊ नका, असं सांगितलं जातं. आम्हाला पोलिस सांगतात तेव्हा आम्ही ते ऐकतो. कोणी, कुठे काय म्हणावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हीही विरोधात काम केलं आहे. आम्हालाही सांगितलं जातं त्या कार्यक्रमांना जाऊ नका. त्याच पद्धतीनं पोलिसांनी राणा दाम्पत्याला सांगितलं होतं, मात्र त्यांनी ते ऐकलं नाही. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेसाठी येऊ नका म्हणून सांगितलं जातं हे चुकीचं आहे. त्यामुळे 'मातोश्री'वर जे व्हायला नको होतं ते झालं आहे. त्याने वातावरण तापलं. राणा दाम्पत्याला पोलिसांनी त्यांना थांबा असंही सांगितलं होतं. मात्र त्यांनी ऐकंल नाही, त्यामुळं पोलिसांना कारवाई केली.

पुढे ते म्हणाले, पंतप्रधान मोदी मुंबईत येणार आहे म्हणून त्यांनी आंदोलन थांबवलं. तरीही त्यातून पुढेही प्रश्न निर्माण झाले. लोकांच्या भावना तीव्र झाल्या. शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पण जेव्हा जमाव प्रक्षुब्ध असतो तेव्हा जाणं योग्य नाही. पण तरीही एक व्यक्ती तिथे गेली आणि त्यामुळे वातावरण आणखीन तापलं. काल त्या घटनेदरम्यान, बहुतेकजण कोल्हापूरला होते. आमचे गृहमंत्री मुंबईत होते, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: 'कायदा सुव्यवस्था धोक्यात, केंद्रात जाण्याआधी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं'

Web Title: Ajit Pawar Criticized On Rana Couple Hanuman Chalisa In Matoshree Yesterday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top