Sachin Tendulkar expressed deep sorrow over the demise of Ajit Pawar
esakal
Ajit Pawar demise reaction Sachin Tendulkar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान दुर्घटनेत निधन झाले. मुंबईहून बारामती येथे एका सभेला संबोधित करण्यासाठी अजित पवार खाजगी विमानातून प्रवास करत होते. विमान लँड करण्याचा प्रयत्न करत असताना वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे या विमानाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.