Ajit Pawar: शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट! ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार तर ३० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

अजित पवार सरकारमध्ये सामील होणार; राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात दुसऱ्यांदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत. तर 30 नेत्यांचा अजित पवारांना पाठिंबा आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह काही नेते अजित पवार यांना पाठिंबा देत आहेत. याबाबतचे वृत्त टिव्ही 9 मराठीने दिले आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवार उपमुख्यमंत्री होणार? पुन्हा मोठा राजकीय भुकंप

आज शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची संभाव्य यादी

अजित पवार

छगन भुजबळ

दिलीप वळसे पाटील

धनंजय मुंडे

हसन मुश्रीफ

अनिल भाईदास पाटील

आदिती तटकरे

संजय बनसोडे

बाबूराव अत्राम

Ajit Pawar
Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! अजित पवारांपाठोपाठ शिंदे-फडणवीस राजभवनाकडे रवाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com