Monsoon Assembly Session: आमचे मित्र अजित पवार - कवी एकनाथ शिंदे; साथ - देवेंद्र फडणवीस

प्रत्येक गोष्टीत राजकारण आणाल तर माझ्याकडेही तुमच्या चिठ्ठ्या चपाट्या आहेत, त्या बाहेर काढण्याची वेळ आणू नका, असा इशाराही शिंदेंनी दिलाय.
Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra FadnavisSakal
Updated on

राज्यसभेचं पावसाळी अधिवेशन यंदा चांगलंच गाजतंय. नेत्यांची टोलेबाजी, टोमणे, गद्दार, ५० खोकेवरुन दिल्या जाणाऱ्या घोषणा या सगळ्याची अधिवेशनामध्ये जोरदार चर्चा झालीय. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेली कविता चांगलीच गाजतेय. अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या असून अनेकांनी यावरुन तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली आहे. (Maharashtra Assembly Monsoon Session CM Eknath Shinde)

Eknath Shinde Devendra Fadnavis
Maharashtra Assembly : विधानसभेतलं Eknath Shinde यांच Uncut भाषण !

विरोधकांना टोला लगावताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असा सूचक इशारा अधिवेशनात काल दिला आहे. सरकारकडून त्रुटी राहिल्या तर नजरेस आणून द्या. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणाल तर माझ्याकडेही तुमच्या चिठ्ठ्या चपाट्या आहेत, त्या बाहेर काढण्याची वेळ आणू नका, असा इशारा मुख्यमंत्री शिंदेंनी दिलाय. शिवाय, हा इशारा नाही, असंही सांगितलं. यावरुन एक कविताही त्यांनी सादर केलीय. ही कविता अशी -

Eknath Shinde Devendra Fadnavis
Maharashtra Session: दिवसभरात आधिवेशनात काय घडले जाणून घ्या

कितीही संकटं येऊ द्या, आपण सगळे एकत्र येऊया

कशाला करायचं राजकारण; आपला उद्देश समाजकारण

एकमेकांना साहाय्य करुया, महाराष्ट्राला पुढे नेऊया.

थांबवा आता शब्दांचे वार, आमचे मित्र अजित पवार

शेवटची ओळ म्हणत असताना शिंदे मधेच थांबले. त्यांनी शेजारी बसलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे पाहून "हे नको ना?" असं विचारलं. हे विचारत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी "आमचे मित्र अजित पवार" ही ओळ म्हणून टाकली आणि सभागृहात चांगलाच हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com