
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन मुंबईत सुरू असून गेले काही दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा वाजताना दिसून येतोय. आज दोन्ही पक्षांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्रीवरुन आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले. भाजपकडून साखर कारखाने खरेदी-विक्रीतील घोटाळ्या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केलेल्या तक्रारीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी उत्तर देताना या साखर कारखाने विक्रीच्या आरोपांबाबत मोठा खुलासा केला आहे. ( Ajit Pawar)
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सहकारी साखर कारखाने खरेदी-विक्रीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सारवा-सारव करणारी उत्तरे दिली. मात्र, अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांवर सरकारला जाब विचारत हक्कभंग लागू करण्याचीही देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली तेव्हा मात्र मग उपमुख्यमंत्री अजित पवारच उत्तर देण्यासाठी उभे राहिले.
अजित पवार म्हणाले की, गेली अनेक वर्षे सहकारी साखर कारखाने खरेदी-विक्री व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. पण मला असं सांगायचंय की, कारण नसताना वेगळ्या पद्धतीने गैरसमज निर्माण होतात. पुढे ते देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा माजी खासदार राजू शेट्टी यांनी अशी तक्रार केली होती.अण्णा हजारे यांनी तुमच्याकडे आणि राज्यपालांकडे तक्रार केली होती. तुम्ही सीआयडी चौकशी लावली. ही चौकशी तुमच्या मुख्यमंत्री काळात झाली. या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही.
अजित पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ही पोलिसांच्या आर्थिक अपराध शाखेला चौकशीचे आदेश दिले. न्यायाधीशांकडून चौकशी केली. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळातच दोन चौकश्या झाल्या. मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. अनेक साखर कारखाने राज्य सहकारी बँकेला द्यायचे लोक आरोप करतात मग कारखाने चालवायला घ्या. साखर कारखाना खरेदी-विक्री बाबत फडणवीस यांच्यासह देशपातळीवर गैरसमज झालेला आहे. प्रत्येकाला साखर कारखाना चालवायचा अनुभव आहे. साताऱ्यात किसनवीर साखर कारखान्यावर 625 कोटीचे कर्ज झाले. आता कारखान्यापेक्षा कर्जच जास्त झालं. समस्या कुणाला माहीत नाही. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात.
उच्च न्यायालयाने आदेश दिला हे साखर कारखाने पैसे देऊ शकत नाही. कारखाने विका. त्यानुसार ही विक्री प्रक्रिया राबविला. अण्णा हजारे यांनी मागे तक्रार केली होती. एकदा त्यांना जाऊन भेटावं आणि विचारावं की, कोणाच्या चौकश्या झाल्या. सीआयडी, एसीपी, ईओडब्ल्यू, न्यायाधीशांकडून चौकश्या झाल्या. त्यात काय झाले हे त्यांना सांगावं. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, असा टोलाही अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
या राज्यात यशवंतराव मुख्यमंत्री आल्यापासून देवेंद्र फडणवीस असेपर्यंत साखर कारखान्यांना सर्रास हमी देण्यात आली. उद्धव ठाकरे सरकार आल्यावर पंढरपूर कारखाना, शंकरराव काळे, धनंजय महाडिक कारखाने, संग्राम थोपटे अश्या पाच कारखान्यांना हमी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले साखर कारखान्यांना राज्य सरकार हमी देणार नाही. अडीच वर्षे झाली जो तो आपला कारखाने चालवत आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.