esakal | भाजपला बसणार मोठा झटका; अजित पवार द्विधा मनस्थितीत?
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar does not take charge as deputy cm

- अजित पवार द्विधा मनस्थितीत? 
- उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार अद्याप स्वीकारला नाही

भाजपला बसणार मोठा झटका; अजित पवार द्विधा मनस्थितीत?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार द्विधा मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या पवार यांनी सोमवारी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे भाजपला हा मोठा झटका असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून अजित पवार यांची मनधरणी सुरू आहे. अजित पवार भेटायला येणाऱ्या प्रत्येक नेत्याशी चर्चा करत आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या बंडखोरीविषयी संदिग्धता कायम आहे. यातच पवार यांनी परतीचे दोर कापल्याने हा गुंता अधिक वाढला आहे. 

मी पुन्हा येईन म्हणणार नाही, कारण आम्ही आलेलो आहोत : उद्धव ठाकरे

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अजित पवार आज विधान भवनात आले. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यशवंतरावांच्या प्रतिमेला अभिवादन केले. विधान भवनातील अभिवादनाचा कार्यक्रम आटोपून देवेंद्र फडणवीस मंत्रालयात आले. त्यांनी सहाव्या मजल्यावरील दालनात जाऊन पदभार स्वीकारला आणि कामकाजाला सुरुवात केली. मात्र, अजित पवार यांनी विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारण्याचे टाळले. 

अजित पवारांनी पदभार स्वीकारला; भाजपनेत्याची माहिती

अजित पवार आज उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारतील आणि पत्रकारांशी बोलतील, असे सांगितले जात होते. मात्र, ते मंत्रालयात न जाताच निघून गेले. त्यामुळे अजित पवार हे वेगळ्या मनस्थितीत आहेत की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, खासदार सुनील तटकरे यांनी आज विधान भवनात येऊन अजित पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात चर्चा केली. ती तब्बल चार तास सुरू होती. या बैठकीत "राष्ट्रवादी'च्या नेत्यांनी बहुतांश आमदार पक्षात परतल्याने आपणही परत या, अशी गळ घातल्याचे समजते. मात्र, त्याला अजित पवारांनी प्रतिसाद दिला नसल्याचे समजते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वळसे-पाटील यांनी अजित पवार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

loading image
go to top