Ajit Pawar Faction: अजित पवारांच्या बैठकीला 4 आमदारांची अनुपस्थिती, लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता असल्याची चर्चा

NCP Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप सुरू असतानाच लंके आणि सोनवणे अजित पवारांच्या गटातून शरद पवारांच्या गटात आले होते.
Ajit Pawar Faction
Ajit Pawar Factionsakal

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित राहिल्याने राष्ट्रवादीमधील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीला धर्मराव बाबा आत्राम, सुनील टिंगरे, आण्णा बनसोडे आणि राजेंद्र शिंगणे हे अनुपस्थितीत होते.

दरम्यान या आमदारांनी ते या बैठकीला का अनुपस्थित होते याची कारणे पक्षाकडे दिली असल्याची माहिती समोर आले आहे. मात्र, लोकसभेचा निवकाल लागल्यानंतर अजित पवार यांच्या गटातील आमदार शरद पवरांकडे जाणार असल्याच्या चर्चा उठल्याने राष्ट्रवादीची धाकधूक वाढली आहे.

अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (एससीपी) उमेदवार नीलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांचा विजय झाल्यानंतर, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्याकडे पुन्हा एकदा येण्यासाठी उत्सुक आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप सुरू असतानाच लंके आणि सोनवणे अजित पवारांच्या गटातून शरद पवारांच्या गटात आले होते.

Ajit Pawar Faction
Ajit Pawar Faction: अजित पवारांच्या बैठकीला 4 आमदारांची अनुपस्थिती, लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता असल्याची चर्चा

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडून पाठिंबा मिळूनही अजित पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला नाही, जिथे त्यांची पत्नी सुनेत्रा निवडणूक लढवत होत्या.

दुसरीकडे 39 आमदारांचा पाठिंबा आणि राज्य सरकारमध्ये असूनही, त्यांच्या गटाला फक्त रायगडची जागा जिंकता आली. विद्यमान खासदार आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला.

जुलै 2023 मध्ये, अजित पवार यांनी शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली होती.

Ajit Pawar Faction
Jayant Patil: "जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा...," आमदारांच्या घरवापसीवर जयंत पाटलांचे पहिल्यांदाच भाष्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com