उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची मनधरणी!

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 7 December 2019

मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे.

मुंबई - मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचे वाटप अद्यापी झालेले नाही. त्यामुळे पवार व ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर चर्चा केल्याचे समजते. 

तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना शरद पवार यांनी बारामतीवरून आज तातडीने मुंबईत बोलावले. ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली.

''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही'' 

अजित पवार यांची तूर्तास मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, पक्षाचे सर्व आमदार व नेत्यांचा अजित पवार मंत्रिमंडळात असावेतच असा आग्रह आहे. अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी सर्व नेते आग्रही आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar favorite for the post of Deputy Chief Minister