...अन् 'दादा' खळखळून हसले!; वाचा का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

दादा तुमच्या चेहऱ्यावर आज बऱ्याच दिवसांनी हसू दिसत आहे, पत्रकाराच्या या प्रश्नावर अजित पवार यांनी आपले हसू आवरत म्हटले की, मी हसलो की तुम्ही म्हणता दादा हसतात, मी शांत बसलो तर तुम्ही म्हणता दादा नाराज आहेत. आता मी नेमका वागू तरा कसा, असा प्रतिप्रश्न करत अजित पवार खळखळून हसले.

मुंबई: दादा तुमच्या चेहऱ्यावर आज बऱ्याच दिवसांनी हसू दिसत आहे, पत्रकाराच्या या प्रश्नावर अजित पवार यांनी आपले हसू आवरत म्हटले की, मी हसलो की तुम्ही म्हणता दादा हसतात, मी शांत बसलो तर तुम्ही म्हणता दादा नाराज आहेत. आता मी नेमका वागू तरा कसा, असा प्रतिप्रश्न करत अजित पवार खळखळून हसले.

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत भाजपच्या गोटात दाखल झालेल्या अजित पवार यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण झाले होते. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादीत आले आहेत. यानंतरही अजित पवार घडामोडींसंदर्भात बोलत नव्हते. गेल्या दोन दिवसांमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांना हजेरी लावत आहेत. आज अनेक दिवसांनी अजित पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. अत्यंत मोकळेपणाने अजित पवार हे माध्यमांशी बोलताना पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण बऱ्याचअंशी कमी झालेला पाहायला मिळाला.

अजित पवार यांनी तुम्ही नाराज आहात का? हे विचारलं असता, कुणी सांगितलं मी नाराज आहे, तसं नाहीये, कोणतंही कारण नसताना मीडियामध्ये बातम्या पसरवल्या जातायत. आज उद्धव ठाकरे शपथ घेतायत, आमचे (राष्ट्रवादी) दोन नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे शपथ घेणार आहेत. त्यामुळे मी नाराज नसल्याचं तअजित पवार म्हणालेत. कॉंग्रेसच्या नेत्यांचा निर्णय सोनिया गांधी किंवा अहमद पटेल यांच्याकडून नाव येतील. ते कॉंग्रेसतर्फे आज शपथ घेणार आहेत. आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून राहिलेली दोन नावं येणार. आज एकूण सात लोकं शपथ घेणार आहे. विश्वास दर्शक ठराव झाल्यावर पुढील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचा गंभीर चेहरा पाहायला मिळत होता. पण, आज दादा खळखळून हसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमे दाखवताना दिसले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar funny reaction on media question whether he is unhappy or not with ncp