esakal | जेव्हा भावूक झालेल्या अजित पवारांना भुजबळ धीर देतात
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar gets emotional chhagan bhujbal makes him comfortable

शरद पवार यांना यामुळे त्रास झाल्याबद्दल संवेदशनील झालेल्या अजित पवार यांच्या डोळ्यांत पाणी आले होते.

जेव्हा भावूक झालेल्या अजित पवारांना भुजबळ धीर देतात

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज, पत्रकार परिषद घेऊन आमदारकीच्या राजीनाम्यामागील भूमिकेवर तसेच, राज्य बँकेतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर खुलासा केला. त्यावेळी आपण संचालक असल्यामुळेच याप्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप झाल्याचे अजित पवार म्हणाले. राज्य बँकेच्या कारभारावर झालेल्या आरोपांमुळे शरद पवार यांना त्रास झाला. त्याबद्दल संवेदशनील झालेल्या अजित पवार यांच्या डोळ्यांत  पत्रकार परिषदेतच पाणी आले होते.  

अजित पवारांच्या डोळ्यात पाणी; म्हणाले, 'कशाला आमच्यात गृहकलह करता?' 

काय म्हणाले भुजबळ?
इतरांप्रमाणे राजकारणातही काम करताना, आम्हीही संवेदनशील असतो. आम्हालाही भावना असतात, असे सांगत अजित पवार भावूक झाले. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना पाणी दिले. तसेच डबडबलेल्या डोळ्यांनी पाणी पिणाऱ्या अजित पवार यांच्या पाठीवरून हात फिरवत. ‘चांगलं झालं. सगळं स्वच्छ झालं.’ असं म्हणत अजित पवार यांना धीर दिला.

अजित पवारांच्या पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराच्या आरोपांची चिरफाड

loading image