Anil Deshmukh : अजित पवार यांचा गट नव्हे हे तर गणेश मंडळ

संघर्ष यात्रेचा मंगळवारी नागपुरात समारोप.
Ajit Pawar and Anil Deshmukh
Ajit Pawar and Anil Deshmukhsakal

नागपूर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कुठलाही गट नाही तर गणेश मंडळ आहे. त्यांच्यासोबत गेलेला एकही आमदार खुश नाही. ते सर्व विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परततील, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघर्ष यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी आमदारांना कुठलेच काम नसून ते लॉबीमध्ये फिरत असतात, असेही सांगितले. आमदार रोहित पवार यांच्या ८०० किलोमीटरच्या यात्रेचा समारोप नागपूरला १२ डिसेंबरला होणार आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी दोन वाजता झिरो माईल चौकात सभा आयोजित केली आहे. या सभेला पाहुणे म्हणून शिवसेना नेते उध्दव ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग उपस्थित राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com