अजित पवारांना क्लिन चिट मिळणं आणि जनतेच्या मनात येणं - खडसे

Eknath-Khadse
Eknath-Khadse

जळगाव - ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याच्या नऊ प्रकरणात क्‍लिन चिट दिली. हा केवळे योगायोग आहे की, जाणीवपूर्वक केलेले आहे. अशी शंका जनतेच्या मनात येणं स्वाभाविक आहे. कारण आज राजकारणावरचा जनतेचा विश्‍वास उडाला आहे,'' अशी उपयोधिक टिका भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केली.

सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलतांना खडसे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत स्वपक्षासह विरोधकांचाही समाचार घेतला ते म्हणाले, "सध्या कोण कोणाच्या सोबत आहे हे कळायला मार्ग नाही, माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनात मी ज्या लोकावर टिका केली आज त्यांच्या सोबत रहावे लागत आहे. ज्या काँ ग्रेसने जन्मापासून शिवसेनेवर जातीयवादी म्हणून टिका केली, तीच कॉंग्रेस आज शिवसेनेसोबत गळ्यात गळे घालत आहे,''

विदर्भ सिंचन महामंडळातील 70 हजार कोटी रूपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील आठ फाईल बंद करण्यात आल्या. यावर बोलताना खडसे उपरोधिकपणे म्हणाले, ''आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारला आणि अजित पवार यांना नऊ प्रकरणात क्‍लिन चिट मिळाली हा निवळ योगायोग आहे, हे काही जाणीवपूर्वक केलेले आहे हे कळायला मार्ग नाही. माझ्यावर नुसते भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावेळी मी नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, आज काय सुरू आहे, हे लोकांना चांगलच माहिती आहे.''

ते पुढे म्हणाले, ''आज राजकारण्यांच्या विषयीचा विश्वास आता जनतेच्या मनातून उडाला आहे. मात्र, याला कोण्यात्याही एका पक्षाला जबाबदार धरून चालणार नाही त्या साठी प्रत्येक पक्ष तेवढाच जबाबदार आहे. आज माझ्याकडे सत्ता नसली तरी लोक मला गेल्या महिनाभर पासून अनेक लोक म्हणतात की, मी आज असतो तर आजही ही राजकीय परिस्थिती निर्माण झाली नसती. आपल्याबाबत जनतेच्या मनात असलेल्या विश्‍वासाचा आपल्याला अभिमान वाटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com