मुंबई - राज्यासह मुंबईतील मशिंदींवर असलेल्या भोंग्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम शिष्टमंडळाची ‘सह्याद्री’ अतिथिगृहावर बैठक झाली. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकून कारवाई करण्यात आली तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि याला सोमय्या जबाबदार असतील, असेही मुस्लिम संघटनांकडून यावेळी सांगण्यात आले. यावर अजित पवार यांनी कोणावरही चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये, अशा सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.