अजित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, राजकीय चर्चांना उधाण |Ajit Pawar Meet Nitin Gadkari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari and Ajit Pawar

अजित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज शुक्रवारी (ता.२९) भेट घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणाऱ्या सभेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. दुसरीकडे भाजपही महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी कशा वाढतील. यावर लक्ष ठेवून आहे. पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी २०१७ मध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी सरकार स्थापन करण्याचे ठरले होते असा गौप्यस्फोट केला. (Ajit Pawar Meet Union Minister Nitin Gadakari)

हेही वाचा: राज यांच्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे घेणार औरंगाबादेत सभा,टीकेला देणार प्रत्युत्तर

त्यावरुन क्रिया-प्रतिक्रिया उमटत आहे. अशी सर्व परिस्थिती असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

हेही वाचा: इफ्तार पार्टीला या ! इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना आमंत्रण

ही भेट ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली. या प्रसंगी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची चर्चा करण्यात आली. सुमारे दीड तास चर्चा झाली.

Web Title: Ajit Pawar Meet Union Minister Nitin Gadakari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top