Ajit Pawar NCP News: ''हे होणारच होतं! काहीही करा यंदा भाजपा आपटणारच!'' काँग्रेसचा मोठा दावा

शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCPSakal
Updated on

Ajit Pawar NCP: राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या जवळपास 30 आमदारांसह एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 30 आमदारांचा पाठिंबा आहे.

शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे, तर सध्याच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने उपमुख्यमंत्री आहेत. अशा प्रकारे आता महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत.

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपण गेम चेंजर्स असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकावत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा सुरु होती. दादांनी पुन्हा मोठा राजकीय भुकंप केल्याचे दिसून आले असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

यातच आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे की, ''हे होणारच होतं! आता निवडणुका झाल्या तर कर्नाटकसारखे बहुमत मविआला मिळेल हे स्पष्ट होते. पक्ष फोडण्याशिवाय भाजपाकडे पर्यायच नव्हता.

Ajit Pawar NCP
NCP New Cabinet Ministers : अजित पवार उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

अमेरिकेत 14 वेळा लोकशाही म्हणणाऱ्या मोदींचा खरा चेहरा तो हाच! नुकतेच भ्रष्टाचारी म्हटले आता त्यांच्या बाजूला बसतील. पण काहीही करा यंदा भाजपा आपटणारच! ''

आज राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटली असून काही दिवसांपासून असलेली धुसपूस समोर आली आहे.

नुकतीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेणार घेतली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com