Bhujbal On Sharad Pawar : वसंतदादा खंजीर प्रकरण उकरले! छगन भुजबळांचा थेट शरद पवारांवर घाव

Sharad Pawar Latest News : छगन भुजबळ म्हणाले की, साहेबांना वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं हे स्वभाविक आहे. पण हे का झालं? लोक म्हणतात त्यांचा (शरद पवारांचा) फोटो का लावला? अरे साहेब आमचे विठ्ठल आहेत.
Ajit Pawar NCP Crisis Chhagan Bhujbal reminded Sharad pawar of Vasantdada Patil Gopinath Munde and Balasaheb Thackeray
Ajit Pawar NCP Crisis Chhagan Bhujbal reminded Sharad pawar of Vasantdada Patil Gopinath Munde and Balasaheb Thackeray

Chhagan Bhujbal Speech Today : राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते छगन भुजबळ यांनी थेट शरद पवारांवर हल्ला चढवला. अजित पवार गटाची आज मुंबईतील एमईटी इंस्टीट्यूट येथील पहिल्याच सभा झाली. यावेळी भुजबळांनी वसंतदादा पाटील, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं उदाहरण देत शरद पवारांवर भाष्य केलं.

आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं

छगन भुजबळ म्हणाले की, साहेबांना वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं हे स्वभाविक आहे. पण हे का झालं? लोक म्हणतात त्यांचा (शरद पवारांचा) फोटो का लावला? अरे साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला या अशी विनंती आहे. ते आमचे विठ्ठल आहेत म्हणून त्यांचा फोटो लावला, असे भुजबळ म्हणाले.

इथे आलेले लोकं वेडे आहेत का? जे लोक तिथे काम कारतात ते याला जबाबदार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना हाडतूड केली जायची, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

Ajit Pawar NCP Crisis Chhagan Bhujbal reminded Sharad pawar of Vasantdada Patil Gopinath Munde and Balasaheb Thackeray
Maharashtra Rain Update : पुढील ७२ तास महत्वाचे; राज्यात 'येथे' होणार पाऊस

भुजबळांचा पवारांवर घणाघात

साहेबांना वाईट वाटणं सहाजिक आहे. आजही माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे. पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांना देखील असचं वाईट वाटलं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो. तेव्हा त्यांच्यासोबत ओबीसीच्या मुद्द्यावर मतभेद झाले तेव्हा ३६ लोक तुमच्यासोबत आले. मला सुद्धा येणं भाग पडलं. तुम्ही तिथं थांबा म्हणून सांगितलं नाहीत. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब यांनाही असंच वाईट वाटलं.

धनंजय मुंडेंना घेतलंत तेव्हा काका असलेले गोपिनाथ मुंडे आणि बहिण पंकजा यांच्या डोळ्यात देखील अश्रू आले होते. या सगळ्याची पुनरावृत्ती व्हायला लागली आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

Ajit Pawar NCP Crisis Chhagan Bhujbal reminded Sharad pawar of Vasantdada Patil Gopinath Munde and Balasaheb Thackeray
NCP Crisis : करेक्ट कार्यक्रमाला सुरूवात! देवेंद्र भुयारांसह ३ कट्टर अजित पवार समर्थक शरद पवारांच्या गोटात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com