अजित पवारांच्या बंडानंतर दिग्गज पत्रकार काय म्हणतायत? भाजपचं भविष्य धोक्यात की राष्ट्रवादीचं? Ajit Pawar NCP News

Ajit Pawar
Ajit Pawar esakal
Updated on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज महाभूकंप बघायला मिळाला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही आमदार घेऊन शपथविधी पूर्ण केला. राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवारांनी या बंडानंतर आक्रमक पवित्रा घेतला असून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहे.

राजकीय विश्लेषक आजच्या बंडाचे राजकीय अर्थ काढत आहेत. ही खेळी भाजपला अंगलट येईल, असं काहींचं म्हणणं आहे. तर काहीजण बंडखोरांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत. शरद पवार यांनी तर बुधवारी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याने कोण कुणासोबत, हे स्पष्ट होणार आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : शपथविधीला गैरहजर नेत्यांची यादी उघड; अजित पवारांसोबत अवघे २२ आमदार?

देशातल्या आणि राज्यातल्या राजकीय विश्लेषकांचं आणि दिग्गज पत्रकारांचं आजच्या राजकीय भूकंपाकडे बारकाईने लक्ष होतं. मागच्या अनुभवांवरुन थेटपणे मत मांडली जात नसली तरी या खेळीवरुन काय घडू शकतं अथवा भाजपने काय साध्य केलं? अशा बोलक्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

Ajit Pawar
BRS on Ajit Pawar: "महाराष्ट्रातील पुढील CM बीआरएसचा"; अजित पवारांच्या शपथविधीनंतर BRS ची भूमिका

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणतात, 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' या भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी विचारांचं काय झालं? ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे ते मुळात दोषीच नाहीत असं ते म्हणत असतील.

पत्रकार धवल कुलकर्णी म्हणातात, महाराष्ट्राच्या 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या ताज्या एपिसोडमध्ये अजित पवार राष्ट्रवादीतून फुटून उपमुख्यमंत्री झाले आहेत. या खेळातील प्रमुख खेळाडूंवर काय परिणाम होतो, हे बघावं लागेल.

पत्रकार बरखा दत्त यांनी म्हटलं की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली होती. आता अजित पवारांनी बंड केलं खरं परंतु हे शरद पवारांच्या संमतीने केलं की त्यांच्या अपरोक्ष...

पत्रकार निखिल वागळे ट्वीट करुन म्हणतात, ज्यांनी ७०००० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मोदींनी केला त्यांनाच आपल्या मंत्रिमंडळात भाजपने घेतलं आहे! जय हो दुटप्पीपणा… दादांची खेळी काकांना ठाऊक होती का नाही याचा गौप्यस्फोट आणखी काही वर्षांनी होईल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com