BRS on Ajit Pawar: "महाराष्ट्रातील पुढील CM बीआरएसचा"; अजित पवारांच्या शपथविधीनंतर BRS ची भूमिका

BRS on Ajit Pawar
BRS on Ajit Pawar
Updated on

BRS on Ajit Pawar : महाराष्ट्राचे राजकारण झपाट्याने बदलत आहे. अजित पवार यांनी आपल्या अनेक समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात बंडखोरी केली असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भारतीय राष्ट्र समीतीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. बीआरएस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी महाराष्ट्रात  शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना गाडण्याचे वक्तव्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात पुढील मुख्यमंत्री बिआरएसचा असेल, असे भाकित केले आहे.

माणिक कदम म्हणाले, "रात्रीचा खेळ चाले या प्रकारे महाराष्ट्रामध्ये शपथविधी झाला आहे. महाराष्ट्रातील जनता डोकं खाजवायला लागली आहे की आता काय कारायचं आणि कुणाला मतदान करायचं. मात्र मतदार आता हुशार झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता के चंद्रशेखर राव यांच्या पाठीमागे उभी आहे.

BRS on Ajit Pawar
Congress: राष्ट्रवादीतील फुटीनंतर 'काँग्रेस' सक्रिय, आखली नवीन योजना! प्रचाराला सुरूवात...

"राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांना मतदान टाकलं तरी ते लोक भाजपकडे जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सक्षम पर्याय बीआरएस देणार आहे. येणाऱ्या काळात बीआरएसचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणार आहे. बीआरएस ना भाजपची टीम आहे ना काँग्रेसची टीम आहे. आम्ही शेतकऱ्यांची टीम आहोत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही," असा इशारा माणिक कदम यांनी दिला आहे.

बीआरएस महाराष्ट्रात स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करत आहेत. नांदेड, नागपूर, सोलापूर येथे के चंद्रशेखर राव यांनी सभा घेतल्या होत्या. अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळात बीआरएस नवीन पर्याय देणार का?, हे आगामी निवडणुकांनंतर स्पष्ट होणार आहे.

BRS on Ajit Pawar
Ajit Pawar : जाहिरातबाजी, मंत्र्याचे उद्योग CM एकनाथ शिंदेंना नडले? भाजपानी नवा मित्र शोधला, कारण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com