Ajit Pawar NCP News : अजित पवारांच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले,"जे घडलं ते ..."

Ajit Pawar NCP News
Ajit Pawar NCP News
Updated on

Ajit Pawar NCP News : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यासोबतच त्यांचे 9 आमदारही शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे 18 आमदार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या बंडावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामध्ये  विकासाचा आम्ही नवा अध्याय लिहू. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार आणि मी तिघे मिळून महाराष्ट्राल पुढे नेऊ. महाराष्ट्राचा विकास करणारे सरकार आम्ही देऊ. जे घडलं ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी घडलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आता आपल्याकडे 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन बनले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत आहे. अजित पवारांचा अनुभव महाराष्ट्राला बळकट करण्यास मदत करेल.

Ajit Pawar NCP News
Maharashtra Politics Updates: राष्ट्रवादीला दिलेली ९ मंत्रिपदे कोणाच्या वाट्याची? शिंदे-फडणवीस सरकारमधील इच्छुक अनेकांचा अपेक्षाभंग

महाराष्ट्राच्या राजकारणावर देशातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत बोलत होते ती लोकशाहीची जननी हीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Ajit Pawar NCP News)

Ajit Pawar NCP News
Ajit Pawar News : अजित पवारांनी शपथ घेतल्यांतर फडणवीसांची भाषा बदलली, म्हणाले तिघं मिळून पुरोगामी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com