Ajit Pawar: अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, कामाला लागा; जेष्ठ नेत्याचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar: अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, कामाला लागा; जेष्ठ नेत्याचं विधान

Nilesh Lanke on Ajit Pawar: राज्यात २०१९ साली भाजपला चितपट करत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांनी एकत्रित येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. यावेळी अनपेक्षितपणे उध्दव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार झाले. या दोघांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष सरकार चालवलं. त्यानंतर राज्यात राजकीय भुकंप झाला आणि मविआचं सरकार कोसळलं सोबतच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं. तेव्हा पासून पुन्हा राज्यात मविआचं सरकार सत्तेत आणण्यासाठी या तिन्ही पक्ष तयारी करत आहे. आगामी काळात अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीतील आमदारांनी तयारी केली आहे.

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे.

आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचे आहे. अजित दादांच्या काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचली पाहिजे. राज्याचा थांबलेल्या विकासाचा गाडा घराघरात पोहोचवणे गरजेचे आहे.

अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपले राज्य २५ वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार लंके यांनी व्यक्त केला.