मतदार दिवसाला अजित पवार यांचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

"१ जुलै हा वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असून तो कृषी दिन म्हणून साजरा होता. अशा वेळी मतदार दिवस जाहीर करुन सरकारने वसंतराव नाईक यांचा अवमान केला आहे."

अजित पवार

मुंबई :  विधानसभेत जीएसटी विधेयक मंजुरीसाठी कामकाजाला सुरवात होताच विरोधक आक्रमक झाले होते. १ जुलै हा मतदार दिवस म्हणून जाहीर केल्याचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, "१ जुलै हा वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असून तो कृषी दिन म्हणून साजरा होता. अशा वेळी मतदार दिवस जाहीर करुन सरकारने वसंतराव नाईक यांचा अवमान केला आहे." 

अजित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुनगंटीवार यांनी त्यावर उत्तर दिले. "मतदार दिवस जाहीर केला आहे, मात्र वसंतराव नाईक यांच्याबद्दल आदर असून कृषी दिन रद्द केला नसल्याचे" अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: ajit pawar objects voter's day in maharashtra