Ajit Pawar Latest : एन्रॉनचा उल्लेख करत बारसू रिफायनरीवर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

बारसू रिफायनरी संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार आहे.
Ajit Pawar On Barsu Refinery Project
Ajit Pawar On Barsu Refinery Project
Updated on: 

Barsu Refinery Project Protest : बारसू रिफायनरी संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी एन्रॉन प्रकल्पासह समृद्धी महामार्गाचा दाखला देत बारसू रिफायनरी वर भाष्य केलं. (Ajit Pawar On Barsu Refinery Project )

आंदोलकांना अटक किंवा धमकी देण्यापेक्षा मानवी दृष्टीकोनातून हे प्रकरण हाताळलं पाहिजे. राज्य सरकारने आंदोलकांच्या भावनांचा, हिताचा आदर केला पाहिजे. पण तस काही दिसत नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा केली. पण राष्ट्रवादी विकासाच्या आड येणार नाही. मात्र, लोकांचे गैरसमज दुर झाले पाहिजेत. लोकांचे प्रश्नही निकाली लागले पाहिजे.

Ajit Pawar On Barsu Refinery Project
Uddhav Thackeray : बारसू रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले...

आधी एन्रॉन प्रकल्पालाही असाच विरोध झाला होता. भाजपा शिवसेनेने त्या काळी तो प्रकल्प आणला. त्यानंतर समृद्धी महामार्गालाही विरोध झाला होता. परंतु लोकांना योग्य मोबदला मिळाल्यावर विरोध दूर झाला.

Ajit Pawar On Barsu Refinery Project
Amruta Fadnavis : मला नरडं आहे, त्यांना गळा...; अमृता फडणवीसांच्या 'त्या' विधानावर सुषमा अंधारेंची खोचक टीका

त्याप्रमाणे बारसूतील प्रकल्पाकडेही पाहता येईल. परंतु कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर परिणाम न होता हा प्रकल्प पुढे न्यावा. आधी लोकांच्या मनातले गैरसमज दूर करावे, संवेदनशील मार्ग काढावा, त्यानंतर सरकारने हा प्रकल्प करावा. अस अजित पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dapoli Villagers Protest
Dinesh Karthik on Gautam Gambhir and Ajit Agarkar
Kalyan Latur Expressway Project Details
Sonam Wangchuk Protest
Marathi News Esakal
www.esakal.com