"ST कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगा एवढा पगार मिळेल, संप मागे घ्या"

राज्यात सध्या सुरु असलेल्य वेगवेगळ्या विषयांवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
Industries in Akola neglected no development plans budget ajit pawar
Industries in Akola neglected no development plans budget ajit pawar esakal

पुणे : ग्रामीण पोलीस कल्याण अंतर्गत विविध उपक्रमांचं आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. काल राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं, त्यानंतर अजित पवार पुण्यात दाखल झाले असून, विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहिलेत. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नागरिकांना त्यांच्या सोयीसाठी डायल ११२ च उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गूडी पाडव्याला होईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली. डायल ११२ पुण्यात सुरु आहे, त्यासाठी आपण १ कोटीचं अनुदान देऊ केलं आहे असं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच त्यांनी यावेळी सांगितलं की, पुणे पोलिसांना चांगल्या गाड्यांची गरज होती, त्या देखील आम्ही दिल्या. राज्यातील वेगवेगळ्या मुद्यांवर बोलत असताना त्यांनी ST कर्मचाऱ्यांच्या संपावर देखील भाष्य केलं. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगा एवढा पगार मिळेल, संप मागे घ्या असं आवाहन केलं.

Industries in Akola neglected no development plans budget ajit pawar
लोणावळा घाटात केमिकल टँकर उलटला; मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद

तसंच आमदारांच्या निधीवर बोलताना ते म्हणाले की, दिलेला निधी लोकांच्या हितासाठी खर्च करायचा आहे. लोकांच्या मनामध्ये गैरसमज होतोय. काल मुंबईत जी घोषणा झाली आहे ती सदनिकाही फुकट मिळणार नाही. सगळ्यांना आमदारांना घरं नाहीत. ज्याचं घर तिथे नाही जे लोकप्रतिनिधी गरीब आहेत, त्यांच्यासाठी हे सर्व आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com