Rajesh Tope Explain Timeline On Baramati Plane Crash
ESakal
महाराष्ट्र बातम्या
Ajit Pawar: अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी पहिल्यांदा कशी आणि कुणाला समजली? राजेश टोपेंनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला!
Rajesh Tope On Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचा आज सकाळी (ता. २८) रोजी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेमुळे राज्यभरात हळहळ पसरली आहे. प्रचारासाठी मुंबईहून बारामती येथे जात असताना लॅण्डिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला.

