Ajit Pawar Sakal Interview : माझी अन् फडणवीसांची जन्मतारीख एकच, पण आमचं साटंलोटं...

Ajit Pawar Sakal Interview : माझी अन् फडणवीसांची जन्मतारीख एकच, पण आमचं साटंलोटं...

पुणेः सकाळ माध्यम समूहाच्या वतीने चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. संपादक सम्राट फडणीस यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी पवारांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मुलाखतीदरम्यान अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. दोन्ही अधिवेशनादरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत सॉफ्ट राहिलात, असा आरोप होतो. या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो. राजकारणात मैत्री असू शकते. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे विरोधक होते. परंतु मैत्रीचे संबंध होते.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

राजकीय मतमतांतर काहीही असले तरी आम्ही एकमेकांचा बांध रेटलेला नाही. आम्ही एकमेकांच्या अंगावर धावून जावं वाटतं का? तसं झालं तरच विरोधक ठरतोल का? परंतु आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. कुणी जाणीवपूर्वक अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं साटंलोट आहे, असं म्हणायला लागलं तर नाईलाज आहे.

यात एक आहे. देवेंद्र फडणवीसांचा जन्म आणि माझा जन्म २२ जुलैचा आहे. परंतु वर्ष वेगवेगळं आहे. त्यात आमचा दोष आहे का? तरी काही सूचना असतील तर निश्चितपणे त्यासंदर्भात काळजी घेण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar Sakal Interview : माझी अन् फडणवीसांची जन्मतारीख एकच, पण आमचं साटंलोटं...
Ajit Pawar Interview: पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात नाईलाजाने काम केलं तर ठाकरेंसोबत....; पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवार यांनी दोन मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का, असा प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले की, क्लेम २०२४ ला का? आताच करणार, असं म्हणून अजित पवारांनी सूचक विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकला.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत बोलतांना सांगितलं की, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं. २०१९ला महाविकास आघाडी झाली. ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आम्ही एकत्रिपणे चांगलं काम केलं. पृथ्वीराज बाबांच्या कार्यकाळात आम्ही चार वर्षे काम केलं. मात्र त्यांच्यासोबत नाईलाजाने काम केलं, असं पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com