
'धर्मांत तेढ निर्माण करुन राज्यात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरूये'
भोंगे बंद करण्यासंदर्भात अजित पवार म्हणाले, 'फक्त मशिदींवरील...'
मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गढूळ झालं आहे. मशिदीवरील भोंगे उतरवण्यापासून ते हनुमान चालीसा पठण करण्यापर्यंत राजकीय वातावरण तापलं आहे. कोरोनानंतर राज्यात रोजगाराची समस्या निर्माण झाली असून त्याकडे लक्ष द्यायला हवं. धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं बंद व्हावं. भोंग्याचे राजकारण बाजूला ठेवून लोकहितासाठी आवश्यक असणारे निर्णय घ्यायला हवेत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेला लगावला आहे. भोंगे उतरवणे आणि हनुमान चालीसा पठण असे विषया हाताशी धरुन राज्यात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे फक्त मशिदीवरील भोंगे बंद होणार नाहीत. असं मतही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. आज ते सोलापुरात बोलत होते.
हेही वाचा: रोहिणी खडसे यांची अमृता फडणवीसांवर नाव न घेता टीका, म्हणाल्या..
राज ठाकरे यांनी भोंग्यांसंदर्भात योगी सरकारचे कौतुक केलं आहे. यावर अजित पवार म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंग उतरवण्याचा निर्णय घेतला आणि मनसेनं त्यांचं कौतुक केलं. मात्र या निर्णयानंतरही सुप्रीम कोर्टाने सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत स्पीकरला परवानगी दिली आहे. महत्वाच्या पंधरा दिवसांत म्हणजेच काही लोकांच्या जयंतीच्या दिवसांना ही वेळ वाढवून रात्री बारापर्यंत केली असल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं आहे.
हनुमान चालीसा पठणावरून उपमुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. ते म्हणाले, हनुमान चालीसा म्हणायची तर तुमच्या घरी म्हणा. एक खासदार आणि आमदार म्हणून तुम्ही जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं, मात्र तुम्ही या विषयात अडकला आहात. मशिदींवरील भोंगे बंद करा अन्यथा तुमच्या घरी हनुमान चालीसा म्हणत तुम्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहात. ज्यामुळे वातावरण खराब होते अशा गोष्टी करायचे कारण काय? असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा: 'बाबरी मस्जिद पाडताना राज ठाकरेंच माहीत नाही, उद्धव ठाकरे मात्र कॅमेरा साफ करत होते'
सध्या राज्यात कोरोनामुळे अर्थव्यवस्था मोठ्या समस्येला तोंड देत आहे. रोजगार कौशल्य विकासाचे महत्वाचे निर्णय घेणे गरजेचे असताना, धार्मिक तेढ निर्माण करणारे निर्णय घेतले जात आहेत, हे हानीकराक आहे. राज्यात कायदा सुवव्यवस्था राखणे आणि वातावरण खराब होणार याची काळजी घेणे आवश्यक आहे. महत्वाच्या निर्णयांपैकी केंद्राने काही निर्णय घेतले आणि ते राज्यसाठी उपयोगी असतील तर राज्यासरकार त्याची अमंलबाजवणी करणार, अशी ग्वाहीही अजित पवार यांनी यावेळी दिली.
Web Title: Ajit Pawar Says Only Masjid Loudspeaker Not Stopped In Solapur Mns
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..