Ajit pawar: अजितदादा है, तो मुमकिन है...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात नागालँडचा प्रयोग?
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarEsakal

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राज्यातील मीडिया यांचे नाते औरच आहे. उपमुख्यमंत्री असताना नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्यापासून सुरू झालेले पवार-मीडियाचे नाते नॉटरिचेबलपर्यंत कायम आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चांनी महाराष्ट्राचे राजकारण तापविले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांचे भवितव्य ठरविणारा सर्वोच्च न्यायालयातील निकाल येण्याच्या काही दिवस अगोदरच अजित पवार आणि भाजप, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. 'अजित पवार है, तो मुमकिन है...' ही शक्यताही नाकारता येत नाही. अजित पवारांचे सोलापूर जिल्ह्यातील कट्टर समर्थक म्हणून अपक्ष आमदार संजय शिंदे यांची ओळख आहे. शिंदे कोठेही असले तरीही अंतिम आदेश मात्र ते अजित पवार यांचाच मानतात. राज्यातील बदलाच्या राजकारणाचे पडसाद येत्या काळात जिल्ह्याच्याही राजकारणात दिसण्याची शक्यता आहे.

- प्रमोद बोडके

विरोधी पक्षनेते पवार आणि आमदार संजय शिंदे यांच्यातील विश्‍वासाचे नाते जिल्ह्याने वारंवार अनुभवले आहे. महाविकास आघाडीच्या काळात झालेली राज्यसभा व विधान परिषद निवडणूक असो की अजित पवारांनी मुंबईत नुकतीच घेतलेली पत्रकार परिषद यामध्ये आमदार शिंदे यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे.

जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळख असलेल्या आमदार शिंदे यांचा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबतचा उघड व छुपा दोस्ताना त्यांची जमेची बाजू आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यापासून आमदार शिंदे करमाळा एक करमाळा एवढ्याच कामात व्यस्त आहेत. भविष्यात अजित पवारांना राज्याच्या सत्तेतील मोठी संधी मिळाल्यास जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे पुन्हा एकदा आमदार शिंदे यांच्या हातात जाण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar: चैत्राच्या ‘वणव्या’त अजितदादांचा कथित ‘जलवा’

१५ मेपर्यंतचा कालावधी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचे प्रकरण ज्या पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे सुरू आहे, त्या घटनापीठातील न्यायमूर्ती मुकेशकुमार रसिकभाई शहा १५ मे २०२३ रोजी निवृत्त होत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. १० ते १५ मे च्या दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अपेक्षित मानला जात आहे.

पुढील शक्यता गृहीत धरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे अजित पवार यांनी माध्यमांसमोर ठासून सांगितले. गट करून पवार भाजपसोबत जाणार नसल्याच्या चर्चा बंद झाल्या असल्या तरीही येत्या काळात राष्ट्रवादी भाजपच्या बाबतीत काय भूमिका घेणार? या प्रश्‍नाने अधिक गूढ वाढविले आहे. या सर्व प्रकरणात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का? शांत आहेत, याची कोडे अद्याप उलगडले नाही.

Ajit Pawar, Sharad Pawar
Heat Wave: इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल इतका कडक! उष्णतेच्या लाटेचा आठ राज्यांना इशारा

अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगताना खारघर येथील दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. खारघर येथील दुर्घटनाही सरकारनिर्मित आपत्ती असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या दुर्घटनेत १३ श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येत असली तरीही ही संख्या अधिक असल्याचा संशय आहे. या कार्यक्रमासाठी शासकीय तिजोरीतून १३ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च झाला. श्री सदस्यांसाठी मंडपाची व्यवस्था का नाही केली? शासनाचा निधी गेला कुठे? हे प्रश्‍न आता दबक्या आवाजात विचारले जाऊ लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारसाठी खारघर येथील दुर्घटना मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Supreme Court: 'न्यायालयाने नैतिक अधिकार वापरावा', समलिंगी विवाहाबाबत याचिकाकर्त्यांची विनंती

महाराष्ट्रात नागालँडचा प्रयोग?

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिंदे यांच्या विरोधात गेल्यास महाराष्ट्रात काय? हा प्रश्‍न चर्चेत आल्यानंतर राष्ट्रपती राजवट, मध्यवधी, स्वतंत्र भाजप सरकार या शक्यता आहेत. नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी यांना बहुमत मिळाले असतानाही तेथील राष्ट्रवादी व इतर पक्ष सत्तेत सहभागी झाले आहेत. नागालँडमध्ये कोणताच पक्ष विरोधी बाकावर नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीस १७ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मध्यावधी निवडणुका कशाला? अशीच भूमिका जवळपास सर्वांची दिसत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या माध्यमातून नागालँडसारखा प्रयोग होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. असा प्रयोग झाल्यास अजित पवार केंद्रस्थानी असू शकतात.

Ajit Pawar, Sharad Pawar
Maharashtra Politics: "राजकीय भूकंप होणारच होता, पण...मी माझ्या विधानावर ठाम"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com