अजित पवारांनी आतातरी परत यावं - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

काँग्रेसच्या गटनेतेपदी आज (मंगळवार) बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर काँग्रेसने सर्व आमदारांच्या सह्या घेऊन राज्यपालांना पत्र दिले आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता अजित पवारांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्या भेटी घेण्यात येत आहेत. अशोक चव्हाण यांनीही त्यांनी परत यावे असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांनी आतातरी परत यावे, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

अजित पवारांना क्लिन चिट मिळणं आणि जनतेच्या मनात येणं - खडसे

काँग्रेसच्या गटनेतेपदी आज (मंगळवार) बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर काँग्रेसने सर्व आमदारांच्या सह्या घेऊन राज्यपालांना पत्र दिले आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता अजित पवारांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्या भेटी घेण्यात येत आहेत. अशोक चव्हाण यांनीही त्यांनी परत यावे असे म्हटले आहे.

काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात; खर्गेंची घोषणा

अशोक चव्हाण म्हणाले, की काँग्रेसकडून कामकाज सुरळीत व्हावे यासाठीच प्रयत्न करण्यात येतील. उद्या विधानसभेच्या कामकाजात गोंधळ होणार नाही. भाजपविरोधात आम्ही सर्व एक आहोत. आमच्याकडे 162 आमदारांचे समर्थन आहे. महाविकासआघाडी उद्या बहुमत सिद्ध करेल. 

काँग्रेसचा गटनेता म्हणून माझी निवड झाल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानतो. हंगामी अध्यक्ष सर्वांत जास्त कार्यकाळ असलेल्याला देण्यात येतो. आता राज्यपाल निर्णय घेतील. हे अल्पमतातील सरकार आहे, हे आम्ही सिद्ध करू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar should come back inside ashok chavan