अजित पवार म्हणतात, 'सदाभाऊंच्या पांढऱ्या शर्टाची घडी आता फारशी मोडत नाही' I Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political

'पूर्वी रापलेल्या सदाभाऊंचा चेहरा आता काही फारसा रापलेला दिसत नाही'

सदाभाऊंच्या पांढऱ्या शर्टाची घडी आता फारशी मोडत नाही - अजित पवार

मागील काही दिवसांपासून विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. अधिवेश म्हटंल की सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप, राजकीय कलगीतुरा या सर्व गोष्टी पहायला मिळतात. बऱ्याचवेळी काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वादामुळे कामकाज स्ठगितही केलं जातं. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तरं दिली जातात. मात्र, त्यातूनही काही सदस्यांच्या मिश्किल शैलीमुळे त्यांची भाषणं हा अधिवेशनातला चर्चेचा विषय ठरतो.

हेही वाचा: 'कारवाईच्या भीतीने काहीजण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत'

असाच एक विषय अधिवेशनात चांगलाच रंगला. शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याशी संबंधित तो विषय होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्या पेहेरावावर केलेली टिप्पणी सभागृहासोबतच खुद्द सदाभाऊ खोत यांचीही दिलखुलास दाद मिळवून गेली. यात अजित पवार म्हणालेत, 'सदाभाऊंचा पेहेराव आता बदलला आहे. पांढऱ्या शर्टाची घडी आता फारशी मोडत नाही. पूर्वी रापलेल्या सदाभाऊंचा चेहरा आता काही फारसा रापलेला दिसत नाही. कारण सभागृहात बसावं लागतं. एसी वगैरे आहे. आता ते निखरू लागले आहेत. सदाभाऊंच्या चेहऱ्यावर हे नवं तेज असंच कायम राहावं या शुभेच्छा', असं अजित पवार यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सदाभाऊंनी मात्र एक दिलखुलास हास्य दिलं आहे.

आता कुणी कुणाचे लाड केले आणि कुणी कुणाला प्रसाद दिला (Prasad Lad) असे म्हणत त्यांनी विधानपरिषदेत चौफेर टोलेबाजी केली आहे. याशिवाय अजब प्रकारच्या आंदोलनांचा विषय निघताच सभागृहातील काही सदस्यांनी आमदार प्रकाश गजभियेंची अजित पवारांना (Ajit Pawar) आठवण करून दिली. त्यावर खोचक टोला लगावताना अजित पवार म्हणाले, “प्रकाश तर काहीही करू शकतो. त्याच्या नावातच प्रकाश आहे, असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: लोहगाव विमानतळ हलवणार नाही; गिरीष बापट आक्रमक

Web Title: Ajit Pawar Statement On Sadabhau Khot Dressing Style In Budget Session

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top