
'विमानतळ कुठेही हलवणार नाही, कोणाला बारामतीला बांधायचं त्यांनी बांधावं'
लोहगाव विमानतळ हलवणार नाही; गिरीष बापट आक्रमक
पुण्याचे विमानतळ (Pune) कुठेही हलवणार नाही. ते कोणाला सुप्याला बंधायचंय, कोणाला बारामती बांधायचं आहे त्यांनी बांधावं, असा टोला खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना लगावला आहे. विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष बापट यांनी पुण्यातील विमानतळ स्थलांतर करणार नाही अशी घोषणा आज केली आहे. पुणेकरांना सोयीचे असल्याने विमानतळ तिथेच राहणार असेही त्यांनी स्पष्ट केलं आहेत. लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबाबत खासदार गिरीश बापट आज प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
हेही वाचा: महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एक निलंबित
पुढे ते म्हणाले, पुण्यातील विमानतळाचे (Pune Airport) स्थलांतर होणार नाही. नागरिकांना आवश्यत असणाऱ्या सुविधा वाढवल्या जातील. याआधी कार्गो लहान होता आता तोही मोठा करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात एका तासात २३०० लोकं ये जा करतील, असे व्यवस्थापन केले जाईल. १४ विमान इथे पार्क करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले आहे. शरद पवारांनी जो प्रस्ताव आणला त्याला विरोध नसून त्याचं स्वागतच आहे. पश्चिम महाराष्ट्राला त्याचा उपयोगही होईल पण लोहगाव विमानतळ विस्तारीकरण होईल हे पक्क आहे. याठिकाणी दळणवळणच्या सुविधा सुरळीत व्हाव्या या हेतूने हा प्रयत्न केला आहे. लष्करी विमानतळ असल्यानं सिव्हील विमानतळ राहणार आहे. यासाठी एक शिष्टमंडळ ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी ते म्हणाले, पुणे लोहगाव विमानतळ हे मध्यवर्ती असून पहिल्यापासून हा लष्करी प्रदेश आहे. पुण्याचा विस्तार, व्यापार, विद्यार्थी एक सांस्कृतिक शहर पाहताना प्रवासी संख्या वाढत आहे. पुण्यात ७० ते ८० हजार पेक्षा अधिक प्रवासी वर्षाला प्रवास करत असतात. पुरंदर, बारामती विमानतळ याला विरोध नाही उलट ती प्रगतीचे लक्षण आहेत. पण पुणेकरांना बाकीचे विमानतळ सोयीचे नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: पुणे हादरलं! नामांकीत शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार
Web Title: Girish Bapat Criticized To Sharad Pawar Dont Move Lohegaon Airport Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..